‘मी विमानतळाकडे निघालोय…’,भावाला शेवटचा फोन ; अहमदाबाद विमान अपघातात उत्तरप्रदेशच्या दाम्पत्याचा दुःखद मृत्यू

Ahmedabad plane crash। गुजरातच्या अहमदाबाद विमान अपघातात उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील अकोला भागातील एका दाम्पत्याचा दुःखद अंत झाला आहे. अपघातात जीव गमावलेले नीरज लवानिया आणि त्यांची पत्नी लंडनला निघाले होते. नीरज वडोदराच्या फेदर स्काय विलास कॉलनीत त्याच्या कुटुंबासह राहत होते आणि एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता.
शेवटचा फोन केला होता भावाला Ahmedabad plane crash।
समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नीरजने त्याचा भाऊ सतीशला फोन करून सांगितले की तो टॅक्सीने विमानतळावर निघाला आहे. तेव्हापासून कुटुंब त्याच्याशी संपर्क साधू शकले नाही. अपघाताची बातमी मिळाल्यापासून कुटुंबात आणि गावात शोककळा पसरली आहे.
कुटुंबातील सदस्य सतत हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधत आहेत, परंतु अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. विमानतळावर आपल्या प्रियजनांचा शोध घेण्यासाठी आलेले कुटुंबातील सदस्य रडत आहेत आणि विमानतळावर सध्या परिस्थिती अत्यंत वाईट आहे. अपघातानंतर गोंधळाचे वातावरण आहे. या अपघाताचे भयानक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या अपघातात २६५ जणांचा मृत्यू Ahmedabad plane crash।
गुजरातमधील अहमदाबादहून लंडनमधील गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान एआय-१७१ गुरुवारी उड्डाणानंतर लगेचच कोसळले. या अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. उपायुक्तांनी याची पुष्टी केली आहे. या विमानात एकूण २४२ जण होते, ज्यात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते.





