67th School National Squash Tournament : अहाना, छवी, ऋत्विका, लोकेश अंतिम फेरीत…

पुणे – महाराष्ट्र स्क्वॉश अकादमी यांच्या वतीने आयोजित व इंडियन ऑईल यांनी प्रायोजित केलेल्या ६७ व्या शालेय राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत वैयक्तिक गटात अहाना सिंग, छवी पांचाळ, ऋत्विका सिंग बुंदेला, छवी सरण, लोकेश एस, इंद्रसिंग बडगुजर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
उंड्री येथील संपूर्णपणे काचेच्या महाराष्ट्र स्क्वॉश अकादमीच्या कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटात दिल्लीच्या अहाना सिंगने तामिळनाडूच्या नित्याश्रीचा ६-११, ११-६, ११-७ असा तर, आयबीएसएसओच्या छवी पांचाळने दिल्लीच्या निरंजना नायरचा ११-५, ११-७ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
मुलांच्या गटात १४ वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या इंद्रसिंग बडगुजरने विवान खन्नाचा ११-७,११-८ असा, तर तामिळनाडूच्या लोकेश एस हिने महाराष्ट्राच्या मानव भांजेचा ११-१,११-५ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात सीबीएससीच्या ऋत्विका सिंग बुंदेलाने आयपीएससीच्या छवी सरणने विजय मिळवत आगेकूच केली.



