Ahan Shetty Horror Film: ‘बॉर्डर 2′ मधील अभिनेत्याची हॉरर चित्रपटात होणार एन्ट्री
Ahan Shetty Horror Film : या चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२६ मध्ये शिमला येथे होण्याची शक्यता

Ahan Shetty Horror Film: विक्रम भट्ट यांनी त्यांच्या पुढील हॉरर चित्रपटाची घोषणा केली होती. गेल्या महिन्यात विक्रम भट्ट यांनी एक मोशन पोस्टर शेअर करत माहिती दिली होती की, ते त्यांची लोकप्रिय फ्रेंचायझी ‘1920’ पुढे नेत आहेत. त्यादरम्यान त्यांनी ‘1920: विंटर इज कमिंग’ ची घोषणा केली. आता या चित्रपटाबाबत एक अपडेट समोर आली आहे.
विक्रम भट्ट यांच्या या हॉरर चित्रपटात अहान शेट्टीची एन्ट्री होणार आहे. अहान शेट्टी शेवटचा ‘बॉर्डर २’ मध्ये दिसला होता आणि या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. यादरम्यानच अहान शेट्टीला विक्रम भट्ट यांच्या ‘1920: विंटर इज कमिंग’ या हॉरर चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे.
विक्रम भट्ट आणि अहान शेट्टी यांच्या ‘1920: विंटर इज कमिंग’ या हॉरर चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित करत असून याचे बजेट १४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२६ मध्ये शिमला येथे करण्याचे नियोजन आहे. मेकर्स सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून मुख्य अभिनेत्रीचा शोध घेत असून अनेक नवीन अभिनेत्री या भूमिकेसाठी उत्सुक आहेत. Ahan Shetty Horror Film
View this post on Instagram
अहान शेट्टीचे चित्रपट
अहान शेट्टीने २०२१ मध्ये ‘तडप’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी केले होते आणि यात तारा सुतारिया त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत होती. यानंतर तो अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर २’ या चित्रपटात दिसला. या चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षकांना अहानच्या आगामी प्रोजेक्टमधून खूप अपेक्षा आहेत. Ahan Shetty Horror Film
हेही वाचा:
Ravindra Dhangekar : खलील शेख प्रकरणामुळे अडचणी वाढल्या! रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल






