बाप्पाच्या विसर्जनाला मनसोक्त नाचणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर : आज अनंत चतुर्दर्शी असल्याने देशभरामध्ये गणपती बाप्पाला मोठ्या उत्सहात निरोप दिला जात आहे. यावेळी प्रत्येकजण आपल्या बाप्पाला निरोप देताना मोठ्या उत्साहाने मिरवणुकीला डान्स करतो. अशाच प्रकारे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर उर्फ बाप्पा मोरे (वय ३६) यांनीही आपल्या गणपतीला निरोप देताना मनसोक्त डान्स केला. मात्र त्यांचा हा डान्स अखेरचा डान्स ठरला.
काय घडले नेमके?
अहमदनगर येथील कोतवाल पोलीस ठाण्यात गणपती बाप्पाची सोमवारी विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीला सर्वा पोलीस गणरायाला आनंदाच्या वातावरणात निरोप देतात. या मिरवणुकीमध्ये पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बाप्पा मोरेसुद्धा सहभागी झाले होते. या मिरवणुकीमध्ये त्यांनी अगदी मनसोक्त डान्स केला.
यानंतर बाप्पाला निरोप दिल्यानंतर हवालदार ज्ञानेश्वर मोरे घरी गेले. यादरम्यान त्यांना रात्री अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना हार्ट अटॅक आल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ज्ञानेश्वार मोरे यांच्या मृत्यू झाल्याने अहमदनगर जिल्हा पोलीस दलावर शोककाळा पसरली आहे.





