कृषी महाविद्यालय सरळगांवच्या विद्यार्थ्यांकडून मानिवली गावात कृषी दिन साजरा

मानिवली (ता. मुरबाड) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत, यशोदिप सामाजिक संस्था संचालित कृषी महाविद्यालय, सरळगांव येथील चतुर्थ वर्षातील “कृषी क्रांती” गटाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र कृषी दिन आणि हरित क्रांतीचे जनक पद्मविभूषण डॉ. वसंतराव नाईक यांची जयंती मानिवली गावात उत्साहात साजरी केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेश व्यापारी होते. प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच लक्ष्मण मुकणे, उपसरपंच व पोलिस पाटील सुरेश व्यापारी, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक मोहपे सर, तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सरोदे सर, गट मार्गदर्शक प्रा. राऊत सर आणि महाविद्यालयाचे प्रा. यादव सर, प्रा. वरगडे सर आणि प्रा. जाणेफळकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांसह काढलेल्या कृषी दिंडीने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन, सरस्वती वंदना आणि डॉ. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांच्या स्वागतार्ह स्वागत गीत सादर केले त्यानंतर कृषीदूतांनी पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी कृषी दिनाचे महत्त्व विषद करत ग्रामस्थांशी संवाद साधला. सरळगांव महाविद्यालयाचे प्राचार्य सरोदे सर आणि प्राध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कृषीदूतांनी शाळेत आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक या वेळी वितरित करण्यात आले.
यानंतर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंचांच्या हस्ते करण्यात आले. यात वात कुक्कुटपालन, गांडूळखत, शेतीचे अवजारे, किड नियंत्रण पद्धती, चारसूत्री भात लागवड प्रक्रिया , तांदूळ तीव्रतेची प्रणाली अशा अनेक मॉडेल्स व उपकरणांचे सादरीकरण करण्यात आले. गावातील शेतकरी, महिला बचत गट व युवकांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या AC Poultry मॉडेलबद्दल विशेष कौतुक केले व प्रत्यक्ष शेतीत त्याचा वापर करण्याची इच्छा व्यक्त केली.
या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो, असे मतही व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांना चहा-नाश्ता आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा मान्यवर व कृषीदुतांच्या हस्ते पार पडला. गावातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी कृषीदुतांचे कौतुक केले. शेतकरी वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग संपूर्ण कार्यक्रमात दिसून आला.





