nagar | कृषिकन्यांकडून गोठा स्वच्छ्ता व निर्जंतुकीकरणाबाबत जनजागृती
Updated On:

जामखेड, (प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषि जागरुकता व कृषि औद्यागिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निवारा /गोठ्याची स्वच्छता निर्जंतुकीकरण करण्याबाबत कर्जत तालुक्यातील कोळवडी येथे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. यामुळे गोठ्याची स्वच्छता होऊन रोगांचा धोका कमी करते.
हे प्राण्यांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर शेतीच्या नफ्यासाठी देखील निर्णायक आहे. याच उद्देशाने विद्यार्थीनींनी शेतकऱ्यांना खालील मुद्यांची माहिती दिली. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या कृषिकन्या दिपीका खेडकर, साक्षी कुलकर्णी, तेजल मिंड, चैत्राली मोरे, संचिता नवले , स्मर्णिका पाडळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.





