पुणे जिल्हा | शेतीपंपांना दिवसा थ्री फेज वीज मिळणार

नारायणगाव, (वार्ताहर) – खेड, जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांबाबत मी आणि जुन्नरेचे आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बोलावलेल्या बैठकीत गंभीर चिंता व्यक्त केली होती. या ठिकाणी शेतीपंपांना रात्रीऐवजी दिवसा थ्री फेज वीजपुरवठा करण्यात यावा अशी आग्रही मागणी आम्ही बैठकीत केली होती.
या मागणीचा अजित पवार यांच्याकडून तातडीने विचार होऊन त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेषबाब म्हणून येथील शेतकर्यांच्या शेतीपंपांसाठी रात्रीऐवजी दिवसा थ्री फेज वीजपुरवठा देण्यात यावा, असा पत्रव्यवहार केला आहे.
आढळराव पाटील म्हणाले की, मला अपेक्षा आहे की, या मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय होऊन खेड, जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळेल. पर्यायाने रात्री अपरात्री शेतकरी बांधवांना शेतात पाणी भरण्यास जावे लागणार नाही व रात्रीच्या वेळी होणार्या बिबट हल्ल्याचा धोका कमी होईल, असे त्यांनी नमूद केले.





