Jambut News : शिरूरच्या बेट भागात कृषीपंप आणि केबलचोरांचा धुमाकूळ; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शेतकऱ्यांचे प्रश्नचिन्ह
Jambut News : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या बेट भागात (पिंपरखेड व परिसर) मागील काही महिन्यांपासून कृषीपंप आणि विद्युत केबल चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

Jambut News : शिरूर तालुक्याच्या बेट भागात मागील काही महिन्यापासून कृषीपंप आणि केबलचोरांनी धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत झालेल्या सर्व घटनांचा विचार करता या चोरीच्या घटनामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे दहा ते बारा लाखांहून अधिकचे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता आहे. (Jambut News)
शिरूर पोलीस स्टेशन आणि टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राला या चोरट्यांचा छडा लावण्यात अपयश आल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Jambut News)
मागील दोन दिवसांपूर्वी पिंपरखेड (ता. शिरूर) येथील घोडनदी काठावरील शेतकरी कैलास बाजीराव बोंबे, बाळू बाबुराव बोंबे, सौरभ भोर, ज्ञानेश्वर बोंबे, जानकू चव्हाण, बळवंत बोम्ने, मारुती बोंबे, स्वप्नील बोंबे, बाबाजी वरे, दादाभाऊ पिंपळे, सागर दांगट, दिलीप बोंबे, पोपट बोंबे, गिरीधर जाधव या शेतकऱ्यांची केबल चोरीला गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. (Jambut News)
ऐन दुष्काळाच्या झळा शेतकरी सहन करत असताना अशा प्रकारच्या चोऱ्या वारंवार घडून येत आहेत, याची कल्पना असूनही पोलीस प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पोलिसांविषयी संशयाची सुई निर्माण झाली आहे. (Jambut News)
मागील महिनाभरात याच ठिकाणाहून तीन वेळ शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्याने आतापर्यंत सुमारे १० लाखांहून अधिकचा मुद्देमाल चोरट्यांनी गायब केला असून पुढील काळात याचा छडा पोलीस कसे लावणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Jambut News)
दरम्यान, मौन धरलेल्या टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राकडून शेतकऱ्यांना न्याय मिळणार कि चोरांची पाठराखण केली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हे गुन्हे उघडकीस न आल्यास पोलीस प्रशासनाच्या विरोधात उपोषण करण्याचा निर्धार परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. (Jambut News)
Jambut News : पिंपरखेडमध्ये जागतिक फार्मासिस्ट व ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात






