पिंपरी | भिमशक्ती संघटना, काॅंग्रेस परिवहन विभागाच्यावतीने आंदोलन

पिंपरी, (प्रतिनिधी) – बदलापूर येथील लहान बालिकांवर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ भिमशक्ती संघटना व काँग्रेस परिवहन विभाग पिंपरी चिंचवड शहर यांचे वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे निषेध आंदोलन करण्यात आले
भिमशक्ती पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष सुरज गायकवाड यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नियोजन सरचिटणीस हरीश डोळस, सचिव मिलिंद फडतरे, युवा भीमशक्ती उपाध्यक्ष प्रतिभा बनसोडे, अध्यक्ष औद्योगिक सेल काँग्रेस प्रतिभा कांबळे यांनी केले.
यावेळी माजी नगरसेविका निगाताई बारस्कर, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, वरिष्ठ उपाध्यक्ष काँग्रेस भरत वाल्हेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष काँग्रेस नरेंद्र बनसोडे,
पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष भिम शक्ती संघटना विजय हिंगे, डॉक्टर सेलच्या डॉ. मनीषा गरुड, अध्यक्ष मागासवर्गीय विभाग विजय ओव्हाळ, अध्यक्ष रोजगार व स्वंयरोजगार सेल काँग्रेस विशाल सरवदे, अध्यक्ष ग्राहक सेल जेवियर ॲन्थोनी, गौरी शेलार,
तारीक भाई, रमेश कांबळे, भिमशाही संघटना अध्यक्ष शिवशंकर उबाळे, उपाध्यक्ष नरेंद्र सोनटक्के, उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड काँग्रेस परिवहन विभाग फिरोज तांबोळी, शहर काॅंग्रेस उपाध्यक्ष जितेन्द्र छाबडा, उपाध्यक्ष ॲड.अनिकेत रसाळ , कपिल डोळस अजय शेरखाने प्रमोद शेलार अशोक गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





