Video : पंचवीस वर्ष जुन्या ‘दिल तो पागल है’च्या गाण्यावर शाहरुखने केला भन्नाट डान्स फॅन्स म्हणतात,”राहुल परत आला…”

मुंबई – नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये नुकताच एक प्रोग्रॅम पार पडला ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे. या सोहळ्यासाठी बॉलिवूडसह हॉलिवूडमधील अनेक बडे स्टार्स देखील हजर होते. यामुळे या कार्यक्रमाची जगभरात चर्चा झाली. सोशल मीडियावर कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या सोहळ्यामध्ये रणवीर सिंग, आलिया भट्ट, रश्मिका मंदन्ना, वरुण धवन आणि शाहरुख खान यांनी डान्स केला. यावेळी शाहरुखने त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पठाणच्या टायटल ट्रकवर देखील जबरदस्त डान्स केला. यासोबतच शाहरुखचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यात तो ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील ‘ले गई ले गई’ गाण्यावर नाचताना दिसत आहे.
हा एक डान्स रिहर्सल व्हिडिओ आहे ज्यामध्ये कोरियोग्राफर श्यामक दावर आणि अनिशा दलाल यांच्यासह शाहरुख स्टेजवर एकत्र दिसत आहे. तिघेही ‘ले गई ले गई’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. शाहरुखच्या या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. शाहरुखच्या तब्बल पंचवीस वर्ष जुन्या गाण्यावर नाचताना पाहून फॅन्स देखील खुश झाले आहेत.
View this post on Instagram
चाहते या व्हिडिओवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले- ओएमजी राहुल परत आला. तर दुसऱ्याने हा रिअल किंग आहे. अशी कमेंट केली. शाहरुखला आपल्याच जुन्या गाण्यावर नाचताना पाहून फॅन्स भलतेच खुश झालेत. शाहरुख लवकरच राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यासोबतच त्याचा जवान हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





