९० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून बॅालीवूडची धक धक गर्ल म्हणून अभिनेत्री माधुरी दिक्षितला ओळखले जाते. तिने आजवर अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांची मने जिंकली. तिने अभिनयासोबतत तिच्या चित्रपटातील डान्सने घायाळ केले आहे. आजही माधुरीच्या चित्रपटातील गाण्यांवर तिच्या हूकअप स्टेप केल्या जातात. नुकताच तिचा एक व्हडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये…” या गाण्यावर माधुरी थरकली आहे. तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. आजही माधुरी तिची डान्सची आवड जोपासताना दिसते. तिच्या बिझी शुड्युलमधून वेळ काढून ती गाण्यांचे व्हिडिओ शेअर करत असते. ५७ वर्षांपूर्वीच्या एव्हरग्रीन बॉलीवूड गाण्यावर तिने डान्स केला आहे. या डान्ससाठी माधुरीने खास रेट्रो लूक केला होता. गळ्यात मोत्यांचा हार, रेट्रो लूक हेअरस्टाइल, वेलवेट साडी अन् त्यावर भरजरी पदर या लूकमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत आहे. यावर तिने सुंदर डान्स केला आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे. व्हिडिओची लिंक https://www.instagram.com/madhuridixitnene/?utm_source=ig_embed&ig_rid=cc00da70-4ca9-4e10-bad9-f5d09433ee47 माधुरीने या डान्स व्हिडीओला, “Retro Vibes For The Win” असे कॅप्शन देत तिचा डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओला तब्बल ७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तिच्या अदा सर्वांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेत आहे. चाहत्यांनी माधुरीच्या या व्हिडिओवर कमेंटसचा अक्षरक्ष: पाऊस पाडला आहे.