‘हिरामंडी’च्या यशानंतर आता सीझन २ येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Heeramandi Season 2| संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हिरामंडी’ या वेबसीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या वेबसीरिने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. यात सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, ऋचा चढ्ढा, शर्मीन सेगल, फरदीन खान, शेखर सुमन यांच्या भूमिका आहेत. पहिल्या सीझनच्या यशानंतर आता लवकरच हिरमंडी सीजन २ देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. भन्साळी प्रॉडक्शनच्या ऑफिशियल पेजवर व्हिडीओ शेअर करत सीजन २ ची घोषणा करण्यात आली.
नेटफ्लिक्स आणि भन्साळी प्रॉडक्शनने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ‘हिरामंडी’च्या वेगवेगळ्या गाण्यांच्या गेटअपमध्ये अनेक महिला समुद्र किनाऱ्यावर दिसत आहेत. या महिला नाचताना दिसतात आणि शेजारी उभे असलेले लोक मोबाईलमध्ये त्यांचे नृत्य रेकॉर्ड करत त्यांना दाद देतात. Heeramandi Season 2|
View this post on Instagram
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी हिरामंडी २ बाबत आनंद व्यक्त केला आहे. तसेच अनेकांनी वेबसीरिज मध्ये पूर्वीचीच कास्ट ठेवण्याची मागणी केली असली तरीही बऱ्याच जणांनी आलम झेबच्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्याची मागणी केली आहे. Heeramandi Season 2|
दरम्यान, या सीझनमध्ये नेमके कोणते कलाकार असणार आणि हा सीझन कधी रिलीज होणार याबाबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
हेही वाचा:
कन्याकुमारीमधील ध्यानधारणेतून नवे संकल्प; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्राद्वारे सांगितला अनुभव





