baba siddique murder case : बाबा सिद्दकींच्या हत्येनंतर पुण्यातील निवृत अधिकाऱ्याच्या मुलाचाही होणार होता खून ;….धक्कादायक माहिती समोर

राष्ट्रवादी काँग्रसेचे पक्षाचे माजी आमदार बाबा सिद्दकी यांच्या हत्येने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या कार्यालयासमोरच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यांना डॅाक्टरांनी मृत घोषित केले. या हत्या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. यानंतर आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून आरोपींनी पोलिसांनी सिद्दकींच्या हत्येनंतर आणखी एकाची हत्या करणार असल्याची कबुली दिली आहे. मुंबई गुन्हे शाखेने आरोपींविरोधात मक्को कोर्टात आरोपपत्र दाखल केले. त्यातून ही बाब समोर आली आहे.
….अन् हत्येचा कट फसला
बाबा सिद्दकी यांच्या हत्येनंतर आरोपींना पुण्यातील एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा खून करायचा होता. तसेच प्लॅनिंग देखील आरोपींनी केले होते. मात्र, त्या आधीच आरोपींना पोलिसांनी सिद्दकी यांच्या हत्येप्रकरणात अटक केली. यामुळे त्यांचा हत्येचा कट फसला असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम मोहोळ आणि गौरव अपूने यांनी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येचा कट आखला होता. शुभम लोणकर हा बिश्नाई गँगसाठी काम करतो.
आरोपींनी पोलिसांना दिली कबुली
पुण्यात सप्टेंबर महिन्यात उत्तम नगर परिसरात गुंड जयदीप भोंडकरची अमित गुर्जने हत्या केली होती. ही हत्या करणाऱ्या गुर्जरला या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने मदत केल्याचा संशय शुभम लोणकरला होता. यामुळे जयदीप भोंडकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी या तिन्ही आरोपींनी निवृत्त अधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येचा प्लॅन आखला होता. पण त्याआधीच त्यांना बाबा सिद्दकी हत्या प्रकरणात अटक झाली. गुन्हे शाखेने ही माहिती उत्तम नगर पोलिसांनी दिली आहे. यामुळे अधिकाऱ्याच्या मुलाला पुरेशी सुरक्षा मिळेल. रुपेश मोहोळ आणि गौरव अपूने चौकशीत निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी ही माहिती मिळाली आहे.





