Ajit Pawar Vs Sharad Pawar : देशभरासह सध्या राज्यात देखील लोकसभेची तयारी सर्वच पक्षांकडून अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमधील लोकसभा निवडणुकांपेक्षा यंदाची लोकसभा काहीशी वेगळी असणार आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन स्थानिक पक्षांमध्ये पडलेली फूट पाहता जनतेचा कौल कोणाला असणार याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात अजित पवार गटात गेलेले २२.. २३ आमदार लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा शरद पवारांसोबत येतील असा दावा शरद पवार गटाच्या नेत्याने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या लोकसभा जागावाटपाबाबतचा सस्पेन्स वाढत चालला आहे. शिंदे आणि अजित पवार गटाला भाजप नेमकं किती जागा देणार ? तर दुसरीकडे ठाकरे आणि शरद पवार गट किती जागा लढणार यावर देखील महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. अशात शरद पवार गटाच्या नेत्याने आमदार पुन्हा परत येतील असा दावा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. । Ajit Pawar Vs Sharad Pawar “अजित पवारांना लोकसभेच्या फक्त चार जागा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दहा जागा मिळतील. गृहमंत्री अमित शहांच त्यांना ऐकावंच लागेल. पण अजित पवारांची भूमिका त्यांच्या पक्षातील सगळ्याच नेत्यांना मान्य होईल असं नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवारांच्या गटातील २२ आमदार परत शरद पवारांकडे येतील असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. । Ajit Pawar Vs Sharad Pawar बारामतीच्या जागेबाबत देखील रोहित पवारांनी यावेळी भाष्य केले.यंदाच्या लोकसभेसाठी पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार असलयामुळे बारामतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारामतीची जनता ही शरद पवारांच्या आणि विचारांच्या पाठिशी राहील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. । Ajit Pawar Vs Sharad Pawar