धक्कादायक ! मुलाच्या मृत्यूनंतर आईने पेटवून घेत केली आत्महत्या
Updated On:

धुळे – शहरातील मोहाडी उपनगरातील महिलेने मुलाच्या मृत्यूचे दु:ख सहन न झाल्यामुळे पेटवून घेत आत्महत्या केली. मालुबाई वायकर असे मृत महिलेचे नाव आहे.
शंकर पांडू नगर येथे राहणाऱ्या उमेश प्रल्हाद वायकर या तरुणाचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला. त्यामुळे वायकर कुटूंबिय दुःखात होते. उमेशच्या मृत्यूमूळे त्याची आई मालुबाई प्रल्हाद वायकर वय. 50 यांची मनस्थिती बिघडली होती.
घरी कोणी नसताना मालुबाई यांनी पेटवून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीय व शेजारी मदतीला धावून आले. त्यांनी अत्यवस्थ स्थितीत मालुबाई यांना हिरे रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.





