कोर्ट मॅरेज केल्यानंतर स्वरा भास्कर म्हणते, ‘पिक्चर अभी बाकी है..!’

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘स्वरा भास्कर’ आपल्या रोखठोक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री सतत सोशल मीडियावर बेधडक वक्तव्य करत कधी कौतुक तर कधी टीकेला सामोरं जाते. अश्यातच अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आणि याच कारण देखील खास आहे.
नुकतंच अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आपल्या बॉयफ्रेंड आणि राजकीय नेता असणाऱ्या फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज आणि साखरपुडा केला आहे. स्वतः स्वराने तिच्या कोर्ट मॅरेजचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. या दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत. फहाद मुस्लीम तर स्वरा हिंदू आहे. मात्र, या दोघांची पहिली भेट शाहिनबागच्या आंदोलनात झाली होती.
दरम्यान, अभिनेत्रीने गुपचूप कोर्ट मॅरेज आणि साखरपुडा केल्यानंतर सर्वांचं धक्का बसला होता. त्यानंतर स्वराने मीडियासोबत संवाद साधताना “पिक्चर अभी बाकी है… ‘असं म्हणत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. यावेळी या जोडप्याने सांगितलं की, ‘लग्न अजून होणार आहे… आम्ही मार्चमध्ये लग्नगाठ बांधणार आहोत’ असल्याचं फहादने सांगितलं आहे.





