मुंबई – देशभरात करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, पुन्हा एका देशात चिंतेचे वातावरण निर्मण झाले आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत मध्ये अनेक राजकीय आणि बॉलिवूड कलाकारांना करोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर, प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या पाठोपाठ आता मराठी अभिनेत्री ‘मिथिला पालकर’ला सुद्धा करोनाचा संसर्ग झाला आहे. या आठवड्यात मिथिलाचा वाढदिवस असतो आणि याच दरम्यान तिचा करोना अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. स्वतः मिथिलाने आपल्या इंस्टाग्रामवर या संदर्भातील एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. मिथिला म्हणते की… “वाढदिवस असणाऱ्या आठवड्याची सुरुवात करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून झाली आहे. मला माहितीये हे फार वाईट आहे. मला सौम्य लक्षणे जाणवू लागली होती. मी स्वत:ला आयसोलेट करुन घेतले आहे. मित्र परिवार आणि कुटुंबीयांशी मी व्हर्चुअली संवाद साधत असते. मी माझ्या कुटुंबापासून लांब आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये मी ज्यांच्या संपर्कात आले त्यांना देखील मी माहिती दिली आहे. मी तुम्हाला आवाहन करते की मास्क लावून फिरा आणि सुरक्षित रहा!’. या आशयाची पोस्ट तिने केली आहे.