कमल हसन यांनी सांगितलं किस्सा,’शोलेमध्ये टेक्नीशियन म्हणून काम केले…’

Entertainment । ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. 19 जून रोजी संध्याकाळी या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण यांच्यासोबत कमल हसन सुद्धा दिसले. या कार्यक्रमात कलाकारांनी चित्रपटाबद्दल चर्चा केली. या काळात अनेक मजेदार आणि भावनिक क्षणही पाहायला मिळाले. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी कमल हसन यांना चित्रपटाच्या पहिल्या शोचे तिकीट दिले.अशात कमल हासन यांनी एक जुना किस्सा सांगितला.
तेलगू चित्रपट उद्योगात, कलाकारांना चित्रपटांच्या पहिल्या शोसाठी तिकीट देण्याची परंपरा आहे. या कार्यक्रमात निर्मात्या अश्विनी दत्त यांनी अमिताभ बच्चन यांना ‘कल्की 2898 एडी’चे तिकीट दिले. त्याबदल्यात बच्चन यांनी ते कमल हसनला दिले. बिग बींचे तिकीट मिळाल्यानंतर कमल हसन खूप खूश झाले. अशात एक जुना किस्सा त्यांनी सांगितला.
मी 1975 मध्ये आलेल्या ‘शोले’ चित्रपटात टेक्नीशियन म्हणून काम केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना त्या काळात चित्रपट पाहण्यासाठी तीन आठवडे बराच वेळ वाट पाहावी लागल्याचेही कमलने सांगितले. ते पुढे म्हणाले ‘ त्या काळाकडे बघितले तर मला अमिताभ बच्चन यांच्याकडून फर्स्ट डे फर्स्ट शोचे तिकीट मिळेल असे कधीच वाटले नव्हते.
दरम्यान, ‘कल्की 2898 एडी’मध्ये कमल हसनने खलनायकाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.





