‘फ्रेडी’चा टीझर पाहून कार्तिक आर्यनवर झाला दर्शकांच्या प्रेमाचा वर्षाव

कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ला मिळालेल्या उदंड प्रतिसाद आणि यशानंतर, आता कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपट ‘फ्रेडी’चा टीझर प्रदर्शित झाला असून, हा चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. युवा सुपरस्टार ‘रूह बाबा’ नंतर कार्तिक आर्यन आता ‘डॉ. फ्रेडी झिनवाला’सह एका अनोख्या भूमिकेतून चाहत्यांना प्रभावित करण्यासाठी सज्ज झाला आहे.
अलीकडेच, कार्तिकने त्याच्या नवीन लूकसह चित्रपटाच्या पहिल्या टीझरने सोशल मीडियावर दर्शकांची उत्कंठा वाढवली आहे. चित्रपटाच्या अत्यंत आश्चर्यकारक आणि धक्कादायक टीझरमध्ये कार्तिक आर्यनला अनोख्या भूमिकेत पाहायला मिळते. त्याचा नवा लुक आणि भूमिका पाहून त्याचे चाहते सोशल मीडियावर त्याचे खूप कौतुक करत आहेत.
‘फ्रेडी’च्या टीझरने २ डिसेंबर रोजी रिलीजची तारीख जाहीर केली आहे. तसेच, कार्तिक आर्यन ‘कॅप्टन इंडिया’, ‘शहजादा’, आणि ‘सत्यप्रेम की कथा’सह कबीर खानच्या पुढील चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे.





