‘सनम तेरी कसम’नंतर तीन बॉलीवूड चित्रपटातून केला पत्ता कट; अभिनेत्रीचा खुलासा

Sanam Teri Kasam | 2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट पुन्हा एकदा 7 फेबुवारीला प्रदर्शित करण्यात आला. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला मोठे यश मिळाले. या सिनेमातील मुख्य अभिनेत्री मावरा होकेन पाकिस्तानी आहे. नुकतीच ती लग्नबंधनात अडकली. मावराला ‘सनम तेरी कसम’ नंतर तीन सिनेमांची ऑफर होती मात्र नंतर तिला त्यातून काढण्यात आलं होतं, असा खुलासा तिने केला आहे.
सनम तेरी कसमसोबत मावराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अलीकडेच तिला एका मुलाखतीदरम्यान तीन भारतीय सिनेमा साइन केल्याच्या चर्चांवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तिने काही चित्रपटांवर काम करण्यास सुरवात केली होती. परंतु नंतर काही कारणांमुळे त्या चित्रपटांपासून दूर जावे लागल्याचे तिने सांगितले. Sanam Teri Kasam |
एका मुलाखतीत मावरा म्हणाली, “सनम तेरी कसम चालला नव्हता आणि नंतर मी ज्या इतर सिनेमांमध्ये काम करणार होते त्यातून मला बाहेर पडावं लागलं. यामागे अनेक कारण होती, पण याविषयी मी कधीच बोलणार नाही हे मी तेव्हाच ठरवलं होतं. कारण जेव्हा तुम्ही एखादा प्रोजेक्ट करु शकत नाही तेव्हा ज्याने तो प्रोजेक्ट केला त्यांचाच तो होतो. त्यामुळे मी त्याविषयी बोलणार नाही.” Sanam Teri Kasam |
‘सनम तेरी कसम २’ बाबत मावरा म्हणाली, “आज सिनेमाला जे यश मिळतंय त्यासाठी ते पात्र आहेत. देव करो याचा दुसरा भाग यापेक्षाही जास्त यशस्वी होवो. मग मी त्यात असले किंवा नसले तरीही. मी नेहमीच सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना करेन. जर शक्य असेल तर मलाही नक्कीच ‘सनम तेरी कसम २’मध्ये काम करायला आवडेल. ९ वर्षांनंतर आज जे यश मिळते. मला भारतातून अनेक जणांचे मेसेज येत आहे. माझं लग्न होतं आणि माझा सिनेमा इतिहास रचत होता हे पाहून मी भारावले. माझा नशिबावर विश्वास आहे त्यामुळे नशिबात असेल तर नक्कीच होईल.” Sanam Teri Kasam |
दरम्यान, ‘सनम तेरी कसम’ हा व्हेलेंटाईन वीकच्या निमित्ताने 7 फेब्रुवारीला पुन्हा थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन या कलाकारांना पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये मोठी गर्दी करत आहेत. Sanam Teri Kasam |
राधिका राय आणि विनय सपरू यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटाचे री-रिलीज ओपनिंग डे कलेक्शन 4 कोटी रुपये होते. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 5 कोटी रुपयांची कमाई केली. फक्त 25 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.
हेही वाचा:
नेवासा : बालविवाह प्रकरणात शासनाची उदासीनता; न्यायासाठी करावा लागला 3 महिने संघर्ष





