रोहित अन् नवदीप सैनीनंतर संघाच्या प्रमुख खेळाडूला दुखापत; दुसऱ्या सामन्यात खेळण्याबाबत शंका

मुंबई – भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर असून दोंन्ही संघामध्ये सध्या २ सामान्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने मोठा विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतलेली आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता होती. मात्र, त्याने या मालिकेतून माघार घेतली आहे. रोहित शर्माला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान हाताला दुखापत झाली होती. त्याचबरोबर संघाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीलाही दुखापत झाली असून त्याने या कसोटी मालिकेतून माघार घेतली. दरम्यान, सलामीचा फलंदाज आणि सध्याचा संघाचा कर्णधार केएल राहुलला सरावावेळी दुखापत झाल्याचे समोर आले आहे.
#RamizRaja | भारताला धमकावणाऱ्या रमीझ राजाला डच्चू; PCBच्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा
२२ डिसेंबरला भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे आता रोहितच्या अनुपस्थितीत कर्णधारपद सांभाळणारा केएल राहुल या सामन्यात खेळणार की नाही याबाबत शंका निर्मण झाली आहे. सध्या तो चांगला लयीत नसला तरी देखील शुबमन गिलसोबत सलामीला केएल राहुल हा उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला आपले कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी बांगलादेशविरुद्धचा विजय अत्यंत गरजेचा आसणार आहे.
#RamizRaja | भारताला धमकावणाऱ्या रमीझ राजाला डच्चू; PCBच्या नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा
केएल राहुलच्या दुखापतीमुळे भारतीय संघाची डोकेदुखी निश्चितच वाढली असणार आहे. भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी राहुलच्या दुखापतीबाबत माहिती दिली. मात्र, तो उद्याच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत कोणत्याही प्रकारचे विधान त्यांनी केलेले नाही. यावेळी माध्यमांशी बोलताना राठोड म्हणाले की, “राहुलला जास्त गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली नाही. तो व्यवस्थित आहे. त्याचबरोबर डॉक्टर त्याच्यावर उपकचर करत आहेत. आम्हाला आशा आहे की तो बरा असेल.”
KL Rahul was hit on the hand in the nets ahead of the second #BANvIND Test match 😯#WTC23https://t.co/XHfqEwYctl
— ICC (@ICC) December 21, 2022
उद्याच्या सामन्याअगोदर राहुलच्या दुखापतीबाबत अधिकृत माहिती दिली जाईल. मात्र, तो या सामन्यात खेळण्यास उपलब्ध न राहिल्यास त्याच्या जागी युवा खेळाडू अभिमन्यू ईश्वरन याला सलामीला खेळण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर कर्णधार पदाची जबाबदारी चेतेश्वर पुजारा किंवा ऋषभ पंत यांच्याकडे दिली जाऊ शकते.





