Ranbir Kapoor : ‘रामायण’नंतर रणबीर कपूरचा बॉक्स ऑफिसवर धमाका! ४ बिग बजेट आगामी चित्रपटांची यादी पाहा
Ranbir Kapoor : आगामी काळात तो तब्बल चार बिग बजेट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे चित्रपट कोणते आणि कधी प्रदर्शित होणार, जाणून घेऊया.

Ranbir Kapoor : सध्या बॉक्स ऑफिसवर ‘रामायण’ या चित्रपटाची हवा आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाच्या कमाईतही सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या चित्रपटात प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रणबीर कपूरच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, ‘रामायण’नंतरही रणबीरकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. आगामी काळात तो तब्बल चार बिग बजेट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे चित्रपट कोणते आणि कधी प्रदर्शित होणार, जाणून घेऊया.
१. लव्ह अँड वॉर
रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘लव्ह अँड वॉर’चा समावेश आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटातील रणबीरचा फर्स्ट लूक याआधीच समोर आला असून, त्याला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळाली आहे. या चित्रपटात रणबीरसोबत आलिया भट्ट आणि विकी कौशल हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.
२. रामायण भाग २
रणबीर कपूरच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांमध्ये ‘रामायण भाग २’चाही समावेश आहे. पहिल्या भागानंतर या चित्रपटाच्या पुढील भागाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. सुरुवातीला हा चित्रपट पुढील दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता प्रदर्शनाचे नियोजन बदलण्यात आले असून, ‘रामायण भाग २’ २०२८ मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
३. ब्रह्मास्त्र भाग २
दिग्दर्शक अयान मुखर्जी यांचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला मोठं यश मिळाले नाही. चित्रपटाने केलेली कमाई आणि मिळालेला प्रतिसाद कमी होता. आता ‘ब्रह्मास्त्र भाग २’मध्ये रणबीर कपूर पुन्हा एकदा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२७ मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर २०२८ च्या सुरुवातीला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकू शकतो.
४. ॲनिमल पार्क
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुराळा उडवून दिला होता. रणबीर कपूरच्या कारकिर्दीतील हा सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या आणि त्याच्या करिअरला कलाटणी देणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी ‘ॲनिमल पार्क’ या सिक्वेलची घोषणा केली होती. सुरुवातीला हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, आता त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले असून, २०२८ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
Relationship Tips: प्रेमाच्या नात्यात संशयाला थारा? सततच्या प्रश्नांमुळे वाढू शकतो दुरावा!





