Pune Municipal Corporation Election : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीत एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यावर आता शिक्कामोर्तेब झाला आहे. पिंपरी चिंचवडनंतर आता पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहेत. आज याबाबतची अधिकृत घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. पुणे महापालिकासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जागावाटपाचा फॅार्म्युला देखील समोर आला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १२५ तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी ४० जागांवर निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने जागावाटपासंदर्भात रविवारी बोलावलेल्या बैठकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठ फिरवली. काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार फोन करूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे महापालिकेसाठी एकत्र येणार आहेत. काका पुतण्यामध्ये संवाद खरंतर रविवारचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण ठरला. अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे बारामती दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. येथील एआय सेंटरचे उद्धाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पवार कुटुंब एकत्र मंचावर उपस्थित होते. गौतम अदानी यांनी आपल्या भाषणातून शरद पवारांचे कौतुक करत त्यांना आपले मार्गदर्शन संबोधले. सर्वात महत्वाचे म्हणजे मंचावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात संवाद झाल्याचे पाहायला मिळाले. दोघांमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली याची माहिती समोर आलेली नाही. हेही वाचा : अखेर सस्पेन्स संपला! ‘या’ महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार; अजित पवारांची थेट घोषणा