Sunil Tatkare : पार्थ पवारांनंतर तटकरेंनी घेतली फडणवीसांची भेट; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय?
Sunil Tatkare : महायुतीकडून उमेदवारी निश्चित करण्यासह निवडणुकीतील संभाव्य गणितांवर फडणवीस आणि तटकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.

Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अंतर्गत नाराजी आणि धुसफूस सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या नव्या यादीत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare ) यांना स्थान न मिळाल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. यामुळे पक्षात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. (Sunil Tatkare)
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली. सुनील तटकरे हे आपल्या पुत्र अनिकेत तटकरे यांना रायगड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पुन्हा विधान परिषदेत पाठवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अनिकेत तटकरे यांचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपल्यानंतर त्यांच्या पुनरागमनासाठी हालचाली सुरू आहेत. Sunil Tatkare
महायुतीकडून उमेदवारी निश्चित करण्यासह निवडणुकीतील संभाव्य गणितांवर फडणवीस आणि तटकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या अंतर्गत घडामोडी, नेतृत्वातील बदल आणि पक्षातील वाढता गोंधळ यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, पक्षातील सूत्रे आता सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या प्रभावाखाली जात असल्याची चर्चा असून, त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे राष्ट्रीय कार्यकारणीतून वगळल्याने पक्षातील अंतर्गत समीकरणांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दुसऱ्या दिवशी तटकरेंनी घेतली फडणवीसांची भेट (Sunil Tatkare)
पार्थ पवार यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून 17 मे रोजी रात्री १० वाजता त्यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांची भेट घेतली. या भेटीमागाचे नेमकं कारण अद्याप समोर आले नसले तरी ही भेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच सुरू असलेल्या अंतर्गत धूसफुसूच्या पार्श्वभूमीवर घेतली असल्याचे सांगितले जात आहे.

Sunil Tatkare : पार्थ पवारांनंतर तटकरेंनी घेतली फडणवीसांची भेट; राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय?
त्यानंतर लगेचचं दुसऱ्याच दिवशी सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादीत काहीतरी मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
हेही वाचा : Raveena Tandon: ‘घरात घुसून धमक्या, मारहाण आणि खंडणीचा प्रयत्न’; रवीना टंडनने सांगितला धक्कादायक अनुभव





