‘पंचायत’नंतर आणखी एक हलकी-फुलकी वेबसीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीस; कधी आणि कुठे पाहता येणार?

Gram Chikitsalaya | ‘पंचायत’ वेबसीरीजने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं. या वेबसीरीजचे आतापर्यंत तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता लवकरच या सीरीजचा चौथा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातच आता या सीरीजचे निर्माते लवकरच चाहत्यांच्या भेटीला एक नवी कोरी वेबसीरीज घेऊन येत आहेत. ‘ग्राम चिकित्सालय’ या नव्या सीरिजच्या माध्यमातून एका गावाची हलकी फुलकी कहाणी यातून पाहायला मिळणार आहे.
‘पंचायत’ सीरीजनंतर ‘ग्राम चिकित्सालय’ही सीरीज सुद्धा TVF बॅनरच्या खाली तयार करण्यात आलेली आहे. ‘ग्राम चिकित्सालय’मध्ये अमोल पाराशर आणि विनय पाठक मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत आकांक्षा रंजन कपूर, आनंदेश्वर द्विवेदी, आकाश मखीजा आणि गरिमा विक्रांत सिंग सारखे प्रतिभावान कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. Gram Chikitsalaya |
View this post on Instagram
या वेबबसिरीजचे पोस्टर रिलीज होताच प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी कमेंट करत नव्या सीरिजबाबत आनंद व्यक्त केला आहे. ही वेबसीरीज येत्या ९ मे रोजी ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’वर रिलीज होणार आहे.
पाच एपिसोड्सची असणारी ही वेबसीरीज शहरातील डॉक्टर एका दूरच्या गावात बंद पडत आलेल्या एका स्वास्थ्य केंद्राला पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करतो. या प्रवासात त्याला गावात काय अडचणी येतात, गावकऱ्यांच्या विचित्र शंकांना तो कसा सामोरा जातो हे सीरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. Gram Chikitsalaya |
हेही वाचा:
जळगावात शरद पवारांना मोठा हादरा…! दोन माजी मंत्री राष्ट्रवादीच्या वाटेवर; कधी होणार पक्ष प्रवेश?





