आमदारांनंतर आता शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात जाण्याच्या तयारीत?

जळगाव – आम्ही काही खासदारांना भेटलो आहे. शिवसेनेचे काही खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
शिवसेनेत बंड केल्यानंतर गुलाबराव पाटील आपल्या घरी पहिल्यांदा पोहोचले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार व 20 माजी आमदार आमच्या सोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट केला.
गुलाबराव पाटील म्हणाले, उद्धव ठाकरेंना सोडणार नाही हा कार्यकर्त्यांना विश्वास होता. मात्र, उद्धव ठाकरेंना आम्ही सोडले नसून उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सोडले आहे. वेळोवेळी उद्धव ठाकरे यांना सांगूनही त्यांनी ऐकून न घेतल्याने शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही बंडखोरी नव्हे, तर उठाव केला आहे.
“शिवसेना ही एकच आहे आणि…” – उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही उभी करणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखविला. आम्ही बंडखोर नसून आमच्या बाळासाहेबांचे घर जे चौफेर जळत आहे. ती आग विझवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहे. उद्धव ठाकरे यांना फसवले जात असून अजूनही उद्धव ठाकरे यांनी सावध राहून फसवणाऱ्या लोकांना दूर करावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना दिला.
राज्यात शिवसेनेनंतर काँग्रेसमध्येही अंतर्गत धुसफूस? ‘त्या’ आमदारांवर कारवाईची मागणी





