Jailer 2 : ‘कावला’नंतर आता ‘अला बोलेलो’चा जलवा! रजनीकांतच्या ‘जेलर 2’मधील गाण्याने वेधलं लक्ष
Jailer 2 : या गाण्यामुळे प्रेक्षकांना 'जेलर'मधील 'कावला' या गाण्याची आठवण झाली असून त्या गाण्यासोबत 'अला बोलेलो' या गाण्याची तुलना केली जात आहे.

Jailer 2 : सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते नेहमी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या रजीकांत त्यांच्या आगामी जेलर २ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या टीझरनंतर आता चित्रपटातील पहिले गाणं चाहत्यांच्या भेटीला आले आहे.
‘अला बोलेलो’ असे या गाण्याचे बोल आहेत. नुकतेच हे गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे. सिने पिक्चर्सने हे गाणे त्यांच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे. या गाण्याचे हिंदी व्हर्जनही प्रदर्शित करण्यात आले असून त्यालाही चांगली लोकपसंती मिळताना दिसत आहे.
या गाण्यामुळे प्रेक्षकांना ‘जेलर’मधील ‘कावला’ या गाण्याची आठवण झाली असून त्या गाण्यासोबत ‘अला बोलेलो’ या गाण्याची तुलना केली जात आहे.
‘अला बोलेलो’ हे गाणं अभिनेत्री शमना कासिमवर हिच्यावर चित्रित करण्यात आले आहे, ज्यात तिने पांढऱ्या रंगाच्या साडीत भन्नाट डान्स केला आहे. सुपरस्टार रजनीकांत यांची देखील झलक गाण्यातून दिसते. हे गाणे ‘जेलर’मधील ‘कावला’पेक्षा वेगळ्या पद्धतीचे आहे.नेटकरी त्याची तुलना जेलरमधील ‘कावला’शी करत आहेत.
संगीत दिग्दर्शक अनिरुद्धने हे गाणे संगीतबद्ध केले असून, त्याचे बोल दिग्दर्शक अरुण राजा कामराज यांनी लिहिले आहेत आणि नृत्यदिग्दर्शन जानी मास्टर यांनी केले आहे. जेलरची खासियत म्हणजे चित्रपटात असणारी अॅक्शन. पण जर बारकाईने बघितल्यास चित्रपटातील गाणी आणि सर्वात म्हणजे बँँकग्राऊड म्युझिकला विशेष महत्व देण्यात आले होते. तीच जादू पुन्हा एकदा सिक्वलमध्ये बघायला मिळणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
‘जेलर २’ कधी प्रदर्शित होणार?
जुलै महिन्यात जेलर २ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्येच हा चित्रपट १५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित आणि सन पिक्चर्सच्या बॅनरखाली ‘जेलर २’ तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत मोहनलाल, शिव राजकुमार, विजय सेतुपती, एस. जे. सूर्या, मिथुन चक्रवर्ती, रम्या कृष्णन, विद्या बालन आणि योगी बाबू या कलाकारांच्याही लक्षवेधक भूमिका आहेत.




