‘गदर 2’ सुपरहिट ठरल्यानंतर आता येणार ‘Gadar 3’; निर्मात्यांनी दिली मोठी माहिती

Gadar 3 – अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल स्टारर चित्रपट ‘गदर 2’ ने रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. तब्बल 22 वर्षांनंतर या सिक्वलमध्ये दिसलेल्या तारा सिंहची दमदार अॅक्शन पुन्हा एकदा प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे.
यासोबतच या ‘गदर 2’ने आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील संसदेच्या नवीन इमारतीत दाखविण्यात येणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. त्यामुळेच 2023 च्या सर्वात हिट चित्रपटांच्या यादीत गदर 2 चा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, अश्यातच ‘गदर 2’ बद्दल एक मोठी बातमी आली आहे. निर्मात्यांनी ‘गदर 3’ येणार असल्याचं सांगितलं आहे. सध्या ‘गदर 3’चे काम सुरू असून ‘गदर 2’ जिथून संपला तिथून निर्माते कथेला सुरुवात करतील. अनिल शर्मा आणि टीमकडेही ‘गदर 3’साठी एक स्फोटक कल्पना आहे, ज्यावर त्यांनी काम सुरू केले आहे. त्यामुळे सिनेमाच्या तिसऱ्या भागात काहीतरी वेगळे आणि मोठे असेल हे नक्की.
गदर: एक प्रेम कथा हा चित्रपट 2001 साली प्रदर्शित झाला होता. निर्मात्यांनी 22 वर्षांनंतर त्याचा सिक्वेल रिलीज केला, ज्याने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडले आणि वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक बनला. सनी देओल शिवाय या चित्रपटात अमिषा पटेल आणि उत्कर्ष सारखे स्टार्स दिसले.





