“फडणवीसांनी शरद पवारांना जाणीव करून दिल्यानंतर…”; शहाजीबापू पाटलांचे विधान

Shahaji Bapu Patil | पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केला असा दावा तेथील काही प्रत्यक्षदर्शीनी केला आहे. यावर राजकीय नेत्यांच्या देखील विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘पहलगामवरील हल्ला हा या देशावरचा हल्ला आहे. ज्या व्यक्तींचे कुटुंब यात शहीद झाले. त्यांनी देशासाठी किंमत दिली आहे. त्यामुळे त्यांचा धर्म, जातपात भाषा या गोष्टी आणायच्या नाही, देशवासीय म्हणून एकत्र यावे लागेल, ‘असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले शहाजीबापू पाटील?
याआधी शरद पवार धर्माचा संबंध नसल्याचे बोलले होते. मात्र फडणवीस साहेबांनी त्यांना जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी आपले शब्द बदलले आहेत, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे. यानंतर त्यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
वडेट्टीवारांना प्रत्युत्तर
“वडेट्टीवार जे बोलत आहेत ते विनाकारण विरोधाला विरोध करण्याचं काम आहे, वडेट्टीवारांनी हल्ल्यातील चित्रीकरण पहावं, या दहशतवाद्यांनी निवांतपणे निष्पाप लोकांना मारले आहे. अतिरेक्यांना भीती वाटण्यासारखे तेथे कोणतेही वातावरण नव्हते. गोरगरीब माणसं होती, लहान मुलं होती, महिला होत्या त्यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे,” असे शहाजीबापू पाटील यांनी म्हणत त्यांनी वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिले. Shahaji Bapu Patil |
‘युद्धाचा जरी निर्णय झाला तरी देश तयार’
पुढे ते म्हणाले की, देशातील 140 कोटी जनता मोदींच्या पाठीमागे आहे. पाकिस्तानला याबाबतीत निश्चित धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे. आज डिप्लोमॅटिक पद्धतीने पहिले पाऊल टाकले आहे. यानंतर अतिरेक्यांबाबत पाकिस्तान काय निर्णय घेतो ते पाहावं लागेल. त्यावर भारताचे पुढचे पाऊल ठरवले जाईल. युद्धाचा जरी निर्णय झाला तरी देश तयार आहे, कारण आपल्याकडे नरेंद्र मोदींसारखं कणखर नेतृत्व आहे, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.
तानाजी सावंतांना लगावला टोला
यावेळी शहाजी बापू पाटील यांनी तानाजी सावंत यांना खोचक टोला देखील लगावला. तानाजी सावंत यांना जे मंत्रिपद मिळाले तेच आश्चर्यकारक आहे. तानाजी सावंत यांची एन्ट्री अचानकपणे झाली आणि ते बाजूला पण अगदी अचानकपणे निघूनही गेले. तसेच ते मोठ्या शिक्षण संस्था चालवतात, पाच-सहा कारखाने सुद्धा झाले आहेत. काही कारखाने त्यांना आणखी खरेदी करायचे आहेत, अशा व्यापामध्ये गुंतल्याने त्यांचे पक्ष कार्यात कमी लक्ष आहे, असा खोचक टिप्पणी शहाजी बापू पाटील यांनी केली. Shahaji Bapu Patil |
हेही वाचा:





