राज ठाकरेंच्या नकलेनंतर आदित्य ठाकरे म्हणाले,’‘त्यांनी’ बाळासाहेब ठाकरेंचं जेवणही काढलं होतं…’

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत. अश्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकतंच मुंबईतील गोरेगावमधील नेस्को मैदानावर पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी तसेच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेकांवर जोरदार हल्लाबोल केला. या सभेमधून त्यांनी चौफेर टोलेबाजी करत, मनसेच्या आंदोलनावरून पक्षावर निशाणा साधणाऱ्यांना राज ठाकरेंनी चांगलेच फैलावर घेतले.
आरोग्याचं कारण सांगून जी व्यक्ती लोकांना भेटत नव्हती. मुख्यमंत्री पदावरून गेल्यावर हे सगळं व्यवस्थित झालं. ज्यावेळेला लोक सांगायचे, आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचंय… पण ते भेटत नव्हते. हा विषय आरोग्य किंवा प्रकृतीचा नाही. तर त्यामध्ये मला काय म्हणायचंय हे समजून घ्या, असं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेनंतर महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अश्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकरांशी बोलतांना यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी काहीही बोललं तरी मी त्यावर फार बोलणार नाही. माझे संस्कार तसे नाहीत. त्यांनी तर एकेकाळी आजोबांचं जेवणही काढलं होतं…असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली
आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘ हे वक्तव्य ऐकून परिवार म्हणून आमच्या ज्या वेदना आणि दुःख आहे, त्यावर मी न बोललेलंच बरं. त्यातच माझे संस्कार दिसून येतील. मला आई-वडिलांनी असंच सांगितलंय. आम्ही त्यात जाणार नाही… मला आठवतंय, त्यांनी तर एकवेळ आजोबांचं जेवणही काढलेलं आहे. आम्ही काही दुःख गिळत जातो.. ती वेगळी गोष्ट आहे…’ असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.





