भाजपाला अहंकारी म्हटल्यानंतर संघाच्या नेत्याचे २४ तासात युटर्न ; म्हणाले,“ज्यांनी प्रभू श्रीरामाचा संकल्प…”

Indresh Kumar U-turn । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु असल्याचे दिसून येत आहेत. संघाचे सरसंघचालक यांनी निकालानंतर संघसेवकांनी नम्रतेने राहावे आणि समाजात दुफळी निर्माण होईल अशी विधाने पुढाऱ्यांनी करू नये, असा सल्ला दिला. तर संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी तर, ज्यांच्यात अहंकार भरला होता, त्यांना प्रभू श्रीरामाने बहुमतापासून रोखले. असे म्हटल्याने विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. त्यांनी केलेल्या या टीकेनंतर खुद्द आता इंद्रेश कुमार यांनी फक्त २४ तासात युटर्न घेतलाय.
ज्यांनी प्रभू श्रीरामाचा संकल्प केला… Indresh Kumar U-turn ।
इंद्रेश कुमार यांनी केलेल्या विधानानंतर सर्व राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडाला होता. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही इंद्रेश कुमार यांच्या वक्तव्यावर भाष्य केले नाही. तसेच इंद्रेश कुमार यांचे विधान वैयक्तिक असल्याची टिप्पणी संघाकडून देण्यात आली. यानंतर आता इंदेश कुमार यांनी सारवासरव केल्याचे दिसत आहे. यासाठी त्यांनी, “ज्यांनी प्रभू श्रीरामाचा संकल्प केला, ते आज सत्तेत आहेत”, असे म्हणत युटर्न घेतला.
त्याआधी गुरुवारी जयपूरच्या एका कार्यक्रमात बोलताना,”ज्यांनी प्रभू रामाची भक्ती केली, ते हळूहळू अहंकारी बनत गेले. त्यांनी स्वतःला सर्वात मोठा पक्ष असल्याचे जाहीर केले. त्यांच्या अहंकारामुळे प्रभू रामाने त्यांना २४० वरच रोखलं. शुक्रवारी इंद्रेश कुमार यांनी आणखी एक विधान केले. यावेळी त्यांनी भाजपाची स्तुती करताना म्हटले, “ज्यांनी प्रभू रामाचा विरोध केला, ते आज सत्तेबाहेर आहेत. ज्यांनी रामाचा संकल्प केला, ते आज सत्तेत आहेत.”
इंद्रेश कुमारांच्या विधानावर विरोधकांची टीका Indresh Kumar U-turn ।
इंद्रेश कुमार यांच्या पहिल्या विधानानंतर काँग्रेसने भाजपावर टीका करण्याची संधी साधली. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, संघाने मागच्या दहा वर्षात सत्ता उपभोगली, मात्र आता निकाल विरोधात गेल्यानंतर त्यांना भाजपाचा अहंकार दिसला आहे. काँग्रेसप्रमाणेच शिवसेना उबाठा गटाच्या संजय राऊत यांनीही भाजपावर टीका केली. ते म्हणाले, मागच्या दहा वर्षात भाजपाने सत्तेचा दुरुपयोग केला. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सूडाचे राजकारण केले. तेव्हा संघाला खरंतर ही भूमिका मांडायला हवी होती. पण तरीही संघाला आता भाजपाच्या चुका लक्षात आल्या असतील तर त्यांनी नरेंद्र मोदींना सत्तेतून दूर करावे.





