बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरूनही आफताब “रॉयल’

बॉलीवूडला मायानगरी असे म्हटले जाते. या ग्लॅमर क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही त्यांची लोकप्रियता तुफान आहे. यातलेच एक नाव म्हणजे अभिनेता आफताब शिवदासानी. आज आफताब त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.
View this post on Instagram
आफताबचा जन्म 25 जून 1978 रोजी मुंबईमध्ये झाला. त्याचे संपूर्ण शिक्षण मुंबईतच झाले. आफताब अगदी लहान असताना तो एका बेबीफूडच्या जाहिरातीमध्ये झळकला होता.
View this post on Instagram
त्यानंतर त्याने वयाच्या 9 व्या वर्षी बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटात काम केले. वयाच्या 19 वर्षी रामगोपाल वर्मा यांच्या “मस्त’ चित्रपटातून उर्मिला मातोंडकरसोबत अभिनयात पदार्पण केले. हा सिनेमा तुफान गाजला. सोबतच या चित्रपटाने आफताबला अनेक पुरस्कारदेखील मिळवून दिले.
View this post on Instagram
यानंतर त्याचे अनेक चित्रपट लागोपाठ फ्लॉप गेले. आफताब फ्लॉप सिनेमे देऊनही एक स्टार अभिनेता म्हणूनच ओळखला जातो. आफताब आजही अनेक चित्रपटांमध्ये झळकत आहे. आफताबच्या मल्टीस्टारर सिनेमांना आणि अडल्ट विनोदी सिनेमांना खूप यश मिळाले.
View this post on Instagram
मात्र असे असूनही आफताब मोठ्या संपत्तीचा मालक आहे. अभिनयाव्यतिरिक्त आफताबचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे आणि इतर कामातून तो वर्षाला 3 कोटींपेक्षा जास्त रुपये कमवतो. मुंबईमध्ये आफताबचे स्वतःचे मोठे आलिशान अपार्टमेंट आहे.
View this post on Instagram





