Afghanistan : अफगाणिस्तानमध्ये नागरी कायद्यांऐवजी इस्लामी कायदा लागू

कंदहार – अफगाणिस्तानमध्ये सत्तारुढ तालिबानने नागरी कायद्यांच्या जागेवर इस्लामी कायदे लागू केले आहेत. देशात “शुद्धीकरण’ मोहिम सुरू केली गेल्याच्या नावाखाली तालिबानने हा फेरबदल केला आहे.
तालिबानने अफगाणिस्तानमधील सत्ता ताब्यात घेतल्यापासून ही शुद्धीकरण मोहिम सुरू करण्यात आली. यानुसार नागरी कायदे रद्द करून संपूर्ण देशाची रचना इस्लामी केली जाणार आहे, असे सुन्नाह जॉर्ज या निरीक्षकाने वॉशिंग्टन पोस्टमधील एका लेखात म्हटले आहे.
सत्ता काबीज घेतल्याला दिड वर्ष झाल्यानंतर तालिबानने देशातील राज्यघटनाच रद्द करून न्याय व्यवस्थाच नष्ट करून टाकली आहे. आता कायद्यांच्या जागेवर इस्लामी कायद्याचा राक्षसी अन्वयार्थ लागू केला जाऊ लागला आहे. आता किरकोळ गुन्ह्यांसाठी लोकांना तुरुंगात डांबण्यात येऊ लागले आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/jasprit-bumrah-to-make-comeback-through-ipl-but-bcci-imposed-a-condition/
नागरी अधिकारांपासून जनतेला वंचित ठेवले जाऊ लागले आहे. प्रसार माध्यमांमध्ये इस्लामिक हेतूच्या अनुषंगाने फेरबदल केले जाऊ लागले आहेत. महिलांच्या उपस्थितीबद्दल आणि संगीताच्या वापराबद्दलही तालिबानने काटेकोर नियम लागू केले आहेत, असेही या लेखात म्हटले आहे.





