AFG vs BAN 1st ODI : अफगाणिस्ताननं गमावलेला सामना जिंकला, गझनफरनं 6 विकेट घेत ‘असं’ पलटवलं लढतीचं चित्र…

AFG vs BAN 1st ODI Highlights : मोहम्मद नबी (84), कर्णधार हशमतुल्ला शाहिदी (52) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर ए.एम. गझनफरच्या (6 विकेट्स) शानदार कामगिरीच्या बळावर अफगाणिस्तानने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचा 92 धावांनी पराभव केला. सामन्यात सहा विकेट घेणाऱ्या ए.एम. गझनफरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
अफगाणिस्तानने बांगलादेशला विजयासाठी 236 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र अल्लाह गझनफर याच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी अशरक्ष: गुडघे टेकले आणि त्यांचा डाव हा 34.4 ओव्हरमध्ये 143 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
𝐀𝐅𝐆𝐇𝐀𝐍𝐈𝐒𝐓𝐀𝐍 𝐖𝐈𝐍! 🙌
AfghanAtalan have put on a remarkable bowling effort to beat Bangladesh by 92 runs in the 1st ODI and take an unassailable 1-0 lead in the series. 👏
Tremendous Result, Atalano! 🤩
#AfghanAtalan | #AFGvBAN | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/84qczboKL2— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 6, 2024
अफगाणिस्ताननं गमावलेला सामना जिंकला..
अफगाणिस्तानने बांगलादेशसमोर 236 धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने 30.3 षटकांत 3 गडी गमावून 132 धावा केल्या होत्या. आता बांगलादेशला येथून विजयासाठी 19.3 षटकात केवळ 104 धावांची गरज होती आणि संघाच्या एकूण 7 विकेट्स शिल्लक होत्या. येथून बांगलादेश सहज सामना जिंकेल असे वाटत होते, परंतु अफगाणिस्तानने पुढच्या चार षटकात केवळ 11 धावा देत बांगलादेशचा 7 विकेट घेत सामन्याचे चित्रच पालटून टाकलं आणि विजय मिळवला. 30.3 षटकांत 3 बाद 132 धावांवर असलेला बांगलादेशचा संघ 34.3 षटकांत 143 धावांत सर्वबाद झाला. अशाप्रकारे अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 92 धावांनी विजय मिळवला.
कसा झाला सामना….
शारजाहच्या शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघ 49.4 षटकात 235 धावांवर सर्वबाद झाला. यादरम्यान अनुभवी फलंदाज मोहम्मद नबीने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 79 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 84 धावा केल्या. याशिवाय कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने 2 चौकारांच्या मदतीने 92 चेंडूत 52 धावा केल्या. याव्यतिरिक्त सेदीकुल्ला अटल (22), गुलबदिन नायब (22), रशीद खान (10) धावा करून बाद झाले तर नंगेलिया खरोटेने नाबाद 27 धावांची खेळी खेळली. याव्यतिरिक्त अफगाणिस्तानच्या पाच फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. बांगलादेशकडून तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. शरीफुल इस्लामने एका फलंदाजाला बाद केले.
WI vs ENG 3rd ODI : केसी-किंगची झंझावाती शतके, वेस्टइंडिजनं तिसऱ्या सामन्यासह मालिकेवरही केला कब्जा…
प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 43 धावांत गारद झाला. कर्णधार नझमुल हुसेन शांतोने बांगलादेशकडून सर्वात मोठी खेळी खेळताना 68 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. तसेच सौम्या सरकारनं 33, मेहदी हसन मिराजनं 28 आणि तॉहीद हृदॉयनं 11 धावा केल्या. पण याव्यतिरिक्त एकालाही अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर उभंही राहता आलं नाही. संघाचे एकूण 7 फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत. हेच संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले. अफगाणिस्तानसाठी ए.एम. गझनफरने 6.3 षटकात 26 धावा देत 6 बळी घेतले तर राशिद खानने दोन विकेट घेतल्या. मोहम्मद नबी आणि ए ओमरझाई यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.



