काबुल: पूर्व अफगाणिस्तानमधील गझनी आणि नागरहार प्रांतातील नॅशनल सिक्युरिटी फोर्सेसवर तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांना सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये 10 तालिबानी मारले गेले, तर अन्य तिघेजण जखमी झाले. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली.
गझनी प्रांताची राजधानी गझनी येथील अस्फंदी आणि नानगरहार प्रांतातील खोग्यानी जिल्ह्यात तालिबान्यांनी हे हल्ले केले. अस्फंदी येथील हल्ल्यात 6 तालिबानी ठार झाले आणि अन्य तीन जण जखमी झाले. तर खोग्यानी जिल्ह्यातील हल्ल्यात आणखीन चार तालिबानी मारले गेले आणि अन्य तिघेजण जखमी झाले.
या दोन्ही चकमकींमध्ये नॅशनल सिक्युरिटी फोर्सेसची कोणतीही जीवितहानी झाली नाही. अमेरिकेबरोबर झालेल्या करारानुसार हिंसाचार कमी करण्यास तालिबानने मंजुरी दिली आहे. मात्र, तालिबानकडून हिंसाचार अद्याप थांबवला गेलेला नाही. अमेरिका आणि अफगाणिस्तानने या मुद्द्यावरून
तालिबानवर टीका केली आहे.