AFG vs AUS – टी-२० विश्वचषक २०२२मध्ये शुक्रवारी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. सामन्यात कांगारूंनी अफगाणिस्तानचा ४ धावांनी पराभव केला. या रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानने आपल्या झुंजार खेळाने प्रेक्षकांची मने जिंकली. अफगाणिस्तानच्या चांगल्या खेळीमुळे यजमानांना विजयनंतरही सेमीफायनल गाठणे जरा कठीणच मानले जात आहे. कारण त्यांना श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. या सामन्यात जर इंग्लंड जिंकला तर ऑस्ट्रलिया स्पर्धेतून बाहेर पडेल अन् सुपर-१२च्या गट-२ मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड सेमीफायलसाठी पात्र ठरतील.
“विराटने नेमकं तो Six कसा मारला”, ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू पडलाय कोड्यात!
ऑस्ट्रलियाविरुद्धच्या ( AFG vs AUS ) सामन्यानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी म्हणाला की, “आज आम्हाला उत्कृष्ट क्रिकेट पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती, पण शेवटी नवीन आणि फारुख यांनी चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे विरोधी संघाने उभारलेली धावसंख्या मोठी नव्हती. फलंदाजीवेळी पॉवरप्लेमध्ये आम्ही चांगली सुरुवात केली. मात्र, मधल्या षटकांमध्ये आम्ही लागोपाठ गडी गमावले आणि तिथून सामना आमच्या हातातून निसटला.”
ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार ऍरॉन फिंचच्या अनुपस्थितीत संघाची जबाबदारी मॅथ्यू वेडकडे होती. सामन्यानंतर तो म्हणाला की, “आम्ही आमच्या सर्व प्रमुख गोलंदाजांकडून सुरुवातीच्या षटकांमध्ये गोलंदाजी करून घेतली, कारण विरोधी संघावर दडपण निर्माण झाले असते. त्यानंतर शेवटी आम्ही स्टॉइनिसला गोलंदाजी दिली. मात्र, आम्ही नेट रनरेट नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात आम्हाला यश मिळाले नाही. आता इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सामना बघूया.”
सामान्याच्या ( AFG vs AUS ) सुरुवातीला नाणेफेक जिंकल्यानंतर अफगाणिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मॅक्सवेलच्या ५४ आणि मिचेल मार्शच्या ४५ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ८ बाद १६८ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाने ठराविक अंतराने गडी गमावले. त्यामुळे अफगाणिस्तान संघ २० षटकांत ७ गडी गमावून १६४ धावाच करू शकला. महत्वाचं म्हणजे रशीद खानने अखेरीस येऊन मोठी फटकेबाजी करत ४८ धावांची नाबाद खेळी केली.
A brilliant fight from Afghanistan, but Australia come out on top in Adelaide 💪#AUSvAFG | #T20WorldCup | 📝: https://t.co/p7lkYsEkcs pic.twitter.com/3jppExEaL1
— ICC (@ICC) November 4, 2022