आल्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?

आल्याचा वापर आपण प्रामुख्याने चहामध्ये करतो. परंतु, याव्यतिरिक्त आले हे बहुगुणी आहे हे बऱ्याच जणांना माहित नसेल. आरोग्यासाठी आले अतिशय फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊयात आल्याचे फायदे…..
आल्याचे फायदे खालीलप्रमाणे –
1. रिकाम्या पोटी आल्याचे पाणी पिल्याने दिवसभरात तुमच्या शरिराला ऊर्जा मिळते.
2. रात्रभर आले पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्या. त्यामुळे तुमची पचनक्षमता मजबूत राहण्यास मदत मिळते.
3. आल्याचे पाणी नियमीत पिल्याने शरिरातील रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. जर तुम्ही रोज व्यायाम आणि चांगल्या आहारासोबतच आल्याचे पाणी पिल्याने वजन घटण्यास मदत होते.
4. आल्यामध्ये व्हिटॅमिन अ आणि क यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आले केसांसाठी आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे.
5. आल्यामध्ये अॅंटिऑक्सिडन्यसचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे कॅन्सर, अल्जायमर इत्यादी समस्या कमी करण्यास आले मदत करते.





