पुणे जिल्हा | लाला बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी ॲड शंकर महाराज शेवाळे

मंचर (प्रतिनिधी) – लोकनेते माजी खासदार स्वर्गीय किसनराव बाणखेले यांनी स्थापन केलेल्या नारायणगाव येथील लाला अर्बन को ऑप बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी मंचर येथील ॲड. शंकर महाराज शेवाळे आणि किरण कर्नाड यांची नियुक्ती बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळ सभेत करण्यात आली.
बँकेचे व्यवस्थापकीय मंडळ अध्यक्षपदी डॉ. जैनुद्दीन मुल्ला यांची, ओस्ट अंतर्गत डेजिस्लेटेड डायरेक्टर म्हणून मंगेश बाणखेले यांची नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान अध्यक्ष युवराज बाणखेले आणि अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांचे हस्ते करण्यात आला.
नवनियुक्त्त तज्ज्ञ संचालक ॲड. शंकर शेवाळे यांच्या माध्यमातून पुणे, भोसरी, आळंदी, चाकण परिसरातील त्यांच्या जनसंपर्कामुळे बँकेच्या ठेव संकलन मोहिमेस गती मिळेल, असा विश्वास अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी जेष्ठ संचालक अशोक गांधी यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत केले.
नजीकच्या जिल्ह्यांमधून ठेवींमध्ये भरघोस वाढ होत असुन ओतूर आणि चाकण शाखेच्या एटीएमलाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद दिलेला असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एन. सुरम यांनी संगितले. याप्रसंगी संचालक अॅड निवृत्ती काळे,
रामदास बाणखेले, अशोक गांधी, नितीन लोणारी, मंगेश वाणखेले, नारायण गाढवे, जयसिंग थोरात, संदीप लेंडे, सचिन कांबळे, सुनिता साकोरे, इंदुमती कवडे, सुनील भुजबळ, भानुदास टेंगले, तज्ज्ञ संचालक अॅड. शंकर शेवाळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप मोरे, वरिष्ठ अधिकारी प्रमोद कांबळे, संतोष पटाडे, मनोहर गभाले, सतीश जाधव, केतन लोंढे उपस्थित होते.





