satara | शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
Updated On:

सातारा, (प्रतिनिधी) – इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सातारा जिल्ह्यात कार्यान्वित असलेल्या दोन वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक संतोष जाधव यांनी केले आहे.
जिल्ह्यात मुलामुलींसाठी प्रत्येकी एक वसतिगृह आहे. या वसतिगृहांची क्षमता प्रत्येकी 100 विद्यार्थी असून, 70 टक्के प्रवेश व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राखीव आहेत. वसतिगृहांमधील प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन होणार असून,
इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी सहाय्यक संचालक, इतर मागास कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.





