Pune Ganesh Visarjan : आदित्य ठाकरे झाले कसबा गणपतीच्या पालखीचे मानकरी

Updated On:
Pune Ganesh Visarjan : आदित्य ठाकरे झाले कसबा गणपतीच्या पालखीचे मानकरी

पुणे : महाराष्ट्राचे माजी पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्रींच्या पालखीला खांदा देऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला.

यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपनेत्या आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधान परिषद सदस्य आणि पुणे संपर्क प्रमुख सचिन अहिर, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, नगरसेवक विशाल धनवडे, प्रशांत बधे, बाळासाहेब भांडे, महीला आघाडी पदाधिकारी अनिता परदेशी, अश्विनी शिंदे, करुणा घाडगे आदी आवर्जून उपस्थित होते.

आज आदित्य ठाकरे, डॉ. नीलम गोऱ्हे, आ. सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेऊन आरती केली. या प्रसंगी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आदित्य ठाकरे यांना आज श्रींचा प्रसाद दिला.

तत्पूर्वी, आदित्य ठाकरे यांनी  कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरास भेट देऊन श्री दत्त गुरूंचे दर्शन घेतले. यावेळी  केलेल्या सत्काराबद्दल आदित्य ठाकरे यांनी ट्रस्टचे आभार मानले.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ