आदित्य ठाकरे, चंद्रकांत पाटलांसह ‘हे’ दिग्गज नेते मंडळी आजच भरणार उमेदवारी अर्ज !

Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज दाखल करायचे आहेत. त्यानुसार विविध राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात आज गुरुपुष्यामृत असल्याने या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनेक दिग्गज नेते मंडळी सरसावले आहेत.
आदित्य ठाकरे, हर्षवर्धन पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अविनाश जाधव यासारखे दिग्गज मंडळी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. Maharashtra Assembly Election 2024 |
कोण-कोणते नेते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार ?
– शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे आज वरळी विधानसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित राहाणार आहेत.
– कोथरुडमधून भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
– राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करतील.
– मुंब्रा मतदार संघातून शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड ही अर्ज दाखल करणार आहे.
– तासगाव विधानसभा मतदार संघातून शरद पवार गटाचे रोहित पाटीलही आजच अर्ज दाखल करणार आहेत.
– हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करतील.
– कोल्हापुरातून समरजीत घाडगेही उमेदवारी दाखल करतील.
– भोरमधून संग्राम थोपटे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
– ठाणे शहर मतदार संघातून मनसेचे अविनाश जाधव हे अर्ज दाखल करतील. यावेळी त्यांच्यासोबत राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत.
– ठाकरे गटाचे राजन विचारे देखील ठाणे शहर मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
– शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील उमेदवारी दाखल करतील.
– लातूर शहरातून आज वंचित बहुजन आघाडीकडून विनोद खटके हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
– सांगलीत भाजपाचे सुधीर गाडगीळ मोठी रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
– कडेगावमध्ये भाजपाचे संग्राम देशमुख अर्ज भरतील.
– दक्षिण सोलापूर मतदारसंघातून भाजपाकडून इच्छुक असलेले सोमनाथ वैद्य हे आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
– राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले भरणार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
– राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून धनंजय मुंडे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
– जतमधून काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत अर्ज दाखल करणार आहेत.
– येवला मतदारसंघातून छगन भुजबळ अर्ज दाखल करतील.
-कळवा-मुंब्रा येथून विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
– आंबेगावमधून मंत्री दिलीप वळसे पाटील उमेदवारी अर्ज दाखल करतील.
– दर्यापूरातून शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ उमेदवारी अर्ज दाखल करतील.
याशिवाय राष्ट्रवादीचे अतूल बेनके, अशोक पवार, सुनिल शेळके हे देखील आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दापोलीमधून शिंदेंच्या शिवसेनेचे योगेश कदम, गुहागरमधून उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे भास्कर जाधव, चिपळूणमधून शरद पवारांच्या पक्षाचे प्रशांत यादव उमेदवारी अर्ज आज दाखल करतील.
तसेच अकोलेचे डॉ. किरण लहामटेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर. तर माढ्यातून आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपाचे नेते अतुल भातखळकर, बंटी भांगडीया, समीर कुणावर हे आज उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. तर धामणगाव रेल्वेतून भाजपाचे उमेदवार प्रताप अडसड अर्ज दाखल करणार आहेत. Maharashtra Assembly Election 2024 |
याशिवाय धनराज महाले हे दिंडोरीमधून, ठाकरे गटाचे राजन साळवी राजापूरमधूंन, संग्राम जगताप – अहमदनगर, राणी लंके – पारनेर, मिहीर कोटेचा – भांडुप पश्चिम, मंगलप्रभात लोढा- मलबार हील, कालीदास कोळंबकर – अँटॉप हील, किरण सामंत- राजापूर येथून आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
हेही वाचा:
माहिममध्ये तिन्ही ‘सेनां’मध्ये तिरंगी लढत, अमित ठाकरे यांचे राजकीय भवितव्य धोक्यात?





