आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खानचा मेट्रो प्रवास; सेल्फीसाठी चाहत्यांची गर्दी

Sara Ali Khan And Aditya Roy Kapoor | बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री सारा अली खान ‘मेट्रो इन दिनो’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या दोघांना अलीकडेच मुंबईत मेट्रोमधून प्रवास करताना पाहण्यात आले. मेट्रोच्या प्रवासाचा आनंद घेताना आणि चाहत्यांसोबत फोटो काढतानाचे त्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये साराने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर आदित्यने पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या शर्टसह निळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. दोघांनी मुंबईच्या मेट्रोमध्ये प्रवास केला. ही मेट्रो राइड त्यांच्या आगामी चित्रपट ‘मेट्रो इन डिनो’च्या प्रमोशनल मोहिमेचा एक भाग होती. यावेळी आदित्य आणि साराला मेट्रोमध्ये पाहून चाहते देखील चकित झाले होते. Sara Ali Khan And Aditya Roy Kapoor |
View this post on Instagram
‘मेट्रो इन डिनो’ हा चित्रपट अनुराग बसू यांच्या 2007 मधील ‘लाइफ इन ए… मेट्रो’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपट 4 जुलै 2025 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या सिनेमात आदित्य कपूर, सारा खान, नीना गुप्ता, अनुपम खेर, अली फजल, फातिमा शेख अशी स्टारकास्ट आहे. ‘लाइफ इन मेट्रो’ या सिनेमाचा हा सीक्वल असल्यामुळे या चित्रपटाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. Sara Ali Khan And Aditya Roy Kapoor |
हेही वाचा:





