राष्ट्रीय स्नूकर स्पर्धा : आदित्य मेहताने पटकावले विजेतेपद
Updated On:

नवी दिल्ली : पेट्रोलियम खेल संवर्धन बोर्डाचे ( पीएसपीबी ) प्रतिनिधित्व करणा-या आदित्य मेहताने ‘पीएसपीबी’च्या पंकज अडवाणीचा पराभव करत राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेतील पुरूष गटाचे विजेतेपद पटकावले.
अंतिम फेरीत आदित्यने पंकज अडवाणीचा १०३( १०३)-१७, ५०-५८, ४७-४८, ७०-४०, ८३(५१)-३६, ६९(६१)-७, ७९-२९, ६४-२८ असा पराभव केला. ही लढत साडेसहा तास चालली.
स्पर्धेत तिस-या स्थानासाठी झालेल्या लढतीत ‘पीएसपीबी’च्या लक्ष्मण रावतने ‘आरएसपीबी’ च्या पुष्पेंदरसिंगचा ७१-५, ३५-८३, ६४-८, ६२-२६ असा पराभव केला.
दरम्यान, यापूर्वी २०१६ मध्ये इंदूरला झालेल्या राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेत आदित्यने मनन चंद्राला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते.





