Jambut News : आदित्य गुंजाळ राज्य कर निरीक्षकपदी; 6 वर्षांच्या जिद्दीने शेतकऱ्याच्या मुलाचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण
Jambut News : चोंभूत (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण आदित्य रघुनाथ गुंजाळ याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश मिळवून 'राज्य कर निरीक्षक' पदाला गवसणी घातली आहे.

Jambut News : चोंभूत (ता. पारनेर) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आदित्य रघुनाथ गुंजाळ याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतून राज्य कर निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याने पुणे येथे सहा वर्षे स्पर्धा परीक्षांचा नियोजनबद्ध अभ्यास करून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. (Jambut News)
आदित्यचे वडील रघुनाथ गुंजाळ व आई छाया गुंजाळ हे शेती व्यवसाय करतात, तर भाऊ वैभव गुंजाळ हा आयटी क्षेत्रात जपान येथे कार्यरत आहे. आदित्य हा जय मल्हार हायस्कूल, जांबूतचा माजी विद्यार्थी आहे. (Jambut News)
विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आदित्य गुंजाळ म्हणाला की, “यशाचे शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना जिद्द, सातत्य आणि संयम ठेवला पाहिजे. चांगल्या मित्रांची संगतही तितकीच महत्त्वाची आहे. मित्रांच्या विचारांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो. (Jambut News)
कुटुंब नेहमीच प्रेरणादायी ठरते. कधीही हार न मानता ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न केल्यास नव्या संधी उपलब्ध होतात.” (Jambut News)
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदाम जगताप, माजी मुख्याध्यापक आर. एस. कापसे, सतीश फिरोदिया,बाबासाहेब गुंजाळ, प्रविण भालेराव, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शितोळे यांनी केले. (Jambut News)
Jambut News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जांबुत शाखेची बॉण्ड वितरणात विक्रमी कामगिरी





