लाडकी बहीण योजनेबाबत अदिती तटकरेंची महत्त्वाची माहिती; म्हणाल्या “आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया…”

Aditi Tatkare | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा महायुती सरकारला झाला. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना पाच महिन्यांचा हफ्ता मिळाला आहे. मात्र अद्याप डिसेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्याने तो कधी मिळणार याकडे सर्वच बहिणींचे लक्ष लागले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र आता विधानसभा निवडणुकांच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आजपासून पुन्हा सुरु झाल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
आदिती तटकरेंची पोस्ट
‘एक्स’ या माध्यमावर पोस्ट शेअर करत अदिती तटकरे यांनी सांगितले की, ‘महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस ( @Dev_Fadnavis) , उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे (@mieknathshinde) आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार (@AjitPawarSpeaks) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.’
महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस ( @Dev_Fadnavis ) , उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे ( @mieknathshinde ) आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार ( @AjitPawarSpeaks ) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) December 24, 2024
ही योजना का विशेष आहे?
1) आर्थिक आधार: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी आधार.
2) सन्मानाचा भाव: केवळ निधी देण्यापुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी आहे.
3) सशक्तीकरण: महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न, जो त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यात मदत करतो.
मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाचा आजचा टप्पा पूर्ण करताना महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन भरून येतं. हा निधी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल, अशी आशा आहे,” असे आदिती तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत 1500 रुपयांप्रमाणे 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती.
2100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात या योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करणार असल्याचे सांगितले होते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा:
नववर्षाची केंद्राकडून राज्याला भेट ; पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधली जाणार 20 लाख घरे





