नववर्षाची केंद्राकडून राज्याला भेट ; पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधली जाणार 20 लाख घरे

PM Awas Yojana । केंद्र सरकारने राज्यातील जनतेला नवीन वर्षाची भेट दिली आहे. केंद्राकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मोठी भेट दिली. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महाराष्ट्रासाठी तब्बल २० लाख नवीन घरे मंजूर करण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्रासाठी 20 लाख नवीन घरांना मंजुरी PM Awas Yojana ।
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून त्यात याविषयीची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये,’प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी 20 लाख नवीन घरांना मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार.’ असे म्हटले आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, “तुम्हाला माहिती आहे की, ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारची प्रमुख योजना, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) 1 एप्रिल 2016 पासून सर्वांसाठी घरे या उद्देशाने राबवत आहे.”असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
महाराष्ट्रात गरिबांसाठी ६३७०८९ घरे बांधली जाणार PM Awas Yojana ।
ते म्हणाले की, “या योजनेचा उद्देश पात्र ग्रामीण कुटुंबांना मूलभूत सुविधांसह पक्की घरे बांधण्यासाठी मदत करणे आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 9 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. ग्रामीण भागातील वाढत्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 2 कोटी अतिरिक्त घरे बांधण्यासाठी ही योजना आणखी पाच वर्षे मार्च 2029 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने अंतिम मंजूर अर्थसंकल्पातून 2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रासाठी 6,37,089 घरांची तरतूद केली आहे. पत्रात म्हटले आहे की, मला तुम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की, भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने तुमच्या राज्यासाठी 2024-25 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 13,29,678 घरांचे अतिरिक्त लक्ष्य मंजूर केले आहे.
देशातील ग्रामीण भागात सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारच्या वचनबद्धतेच्या दिशेने हे एक पाऊल आहे. तुमच्या राज्यासाठी आर्थिक वर्ष 2024-25 साठी एकत्रित लक्ष्य 19,66,767 घरांचे असेल. तुमच्या राज्यात PMAY-G च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी या मंत्रालयाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यासाठी मी ही संधी घेऊ इच्छितो.” असे त्यांनी यावेळी म्हटले.





