Manoj Muntsheer : Adipurush माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक : लेखक मनोज मुंतशिर यांनी मागितली जाहीर माफी
Manoj Muntsheer : आदिपुरुष या चित्रपटाची निर्मिती मोठ्या स्किलवर करण्यात आली होती. या चित्रपटावर मोठा खर्च करण्यात आला होता. मात्र, सगळ्याच बाजूने चित्रपट प्रेक्षकांची निराशाच करणारा ठरला.

Manoj Muntsheer : मोठा गाजावाजा करत २०२३ मध्ये आदिपुरुष हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात प्रभास, कृती सॅनॉन आणि सैफ अली खान यांसारखे तगडे कलाकार होते. मात्र, तरीही बॅाक्स अॅाफिसवर हा चित्रपट सपशेल अपयशी ठरला.
चित्रपटातील संवाद, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि रामायणातील पात्रांचे चित्रण यावर प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता तब्बल तीन वर्षांनंतर चित्रपटाचे संवादलेखक मनोज मुंतशीर यांनी हा चित्रपट मोठी चूक असल्याची कबुली देत जाहीर माफी मागितली आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना मनोज मुंतशीर म्हणाले, “सुरुवातीला मी या टीकेला फारसं गांभीर्याने घेतलं नाही. पण दोन दिवसांत मला माझी चूक लक्षात आली. ‘आदिपुरुष’ हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चुकीचा निर्णय होता आणि त्याचं समर्थन करणं ही त्याहून मोठी चूक होती. जे काही घडलं त्याबद्दल मला मनापासून लाज वाटते आणि मी संपूर्ण देशाची माफी मागतो.”
आदिपुरुष या चित्रपटाची निर्मिती मोठ्या स्किलवर करण्यात आली होती. या चित्रपटावर मोठा खर्च करण्यात आला होता. मात्र, सगळ्याच बाजूने चित्रपट प्रेक्षकांची निराशाच करणारा ठरला. या चित्रपटामुळे मोठा वादही निर्माण झाला होता. चित्रपटातील संवाद वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यावर भाष्य करताना मुंतशीर यांनी “आज मागे वळून पाहताना मला ते संवाद लिहिल्याची लाज वाटते. त्या वेळी मी कोणत्या विचारातून ते लिहिले, हेच आता मला समजत नाही,” अशी कबुली त्यांनी दिली.
‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यानंतर रामायणातील पात्रांचे कथित चुकीचे चित्रण, संवादांची भाषा आणि विशेषतः रावण व हनुमान यांच्या व्यक्तिरेखांवरून मोठा वाद निर्माण झाला होता. ‘कपडा तेरे बाप का’ हा संवाद बदलूनही प्रेक्षकांचा रोष कमी झाला नव्हता. सीतेची भूमिका साकारणाऱ्या कृती सॅनॉननेही चित्रपटावर झालेल्या टीकेबद्दल दुःख व्यक्त केले होते. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभासने प्रभू श्रीराम, कृती सॅनॉनने सीता आणि सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली होती.





