satara | आदर्श शाळेच्या विद्यार्थ्यांचा एनएसएसई परीक्षेत राज्यात झेंडा

दहिवडी, (प्रतिनिधी) – येथील आदर्श मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामिनेशन(एनएसएसई) या परीक्षेत राज्यात झेंडा फडकवला असून मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांच्या कल्पकतेमुळे एकूण ३० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
या परीक्षेत इयत्ता पहिलीच्या १२ विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता दाखवून दिली. यामध्ये आरोही जाधव(रँक -०७), आरुष मुळीक (रँक -१०), ओम जाधव(रँक -१०), मंगेश खुस्पे (रँक -१०), प्रथमेश घोडके (रँक -११), स्वराज साखरे (रँक -११), परिणीता भोसले (रँक -११), अनुष्का जगदाळे (रँक -११), अन्वी सावंत ( रँक -१२), शिवण्या माळवे (रँक – १२), आर्या शिंदे (रँक -१२) आणि शिवश्री जगदाळे (रँक -१३) यांचा समावेश आहे.
इयत्ता दुसरीच्या ०५ विद्यार्थ्यांमध्ये शिवम शेंडे (रँक -०३), रोहन जगताप ( रँक -१०), अर्णव शिंदे (रँक -१०), रिद्धी लोंढे (रँक -१०), राफिया शेख (रँक -१०) यांनी यश संपादन केले आहे.
इयत्ता तिसरीच्या ओंकार शिंदे (रँक -०४), अंशुमन वीरकर (रँक -०५), शर्विल बंडगर (रँक -०६), प्रांजल काटकर (रँक – ०९), ज्ञानदा काशीद ( रँक -१०) या एकूण ०५ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पटकावला आहे, तर इयत्ता चौथीच्या अथर्व सावंत (रँक -०३) ,श्रुती इंगळे (रँक -०६), अक्षदा उगलमोगले (रँक – ०६), हर्षदा गोरे (रँक -०७), विराज गोरे ( रँक -०९), मंजिरी मदने (रँक -०९), अक्षरा गोरे (रँक -१०), आरोही खाडे ( रँक -१२) या ०८ विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या आधारे गुणवत्ता संपादन केली आहे.
या यशाबद्दल श्री सिद्धनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. आर. बी.जाधव, सचिव सौ. शीला जाधव , मुख्याध्यापक लालासाहेब दडस,यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.





