अभिनेत्री वंदना गुप्तेंच्या पायाला दुखापत; नाटकाचे प्रयोगही करावे लागले रद्द

Vandana Gupte | ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी मराठी चित्रपटासह, मालिका आणि नाटकामध्ये देखील काम केले आहे. विनोदी भूमिकांसाठी त्या विशेष ओळखल्या जातात. नुकताच त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत दुखापत झाल्याचे सांगितले आहे. वंदना गुप्तेंचा पावसामुळे एक छोटासा अपघात झाला आहे, ज्यामुळे त्यांचे नाटकाचे प्रयोगही रद्द झाले आहेत.
वंदना गुप्तेंनी इन्स्टाग्राम स्टोरीवर याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचा नातूही पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये वंदना गुप्ता म्हणतात की, “मी परवा पावसाच्या पाण्यात पाय घसरून पडले. त्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली आहे. मला चालायलाही भयंकर त्रास होत आहे. दुखापतीमुळेच ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाचा १८ सप्टेंबरचा पुण्यातला आणि १९ सप्टेंबरचा बोरिवलीचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. ही गोष्ट माझ्यासाठी खूप दुःखदायक आहे. यासाठी मी सर्व प्रेक्षकांना सॉरी म्हणते.”
View this post on Instagram
त्यानंतर व्हिडीओमध्ये वंदना गुप्तेंचा नातू रियान त्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देतो. दरम्यान, या अपघातात वंदना गुप्तेंच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, ज्यामुळे त्यांना चालतानाही त्रास होत असल्याचं या व्हिडीओमधून दिसत आहे. वंदना गुप्तेंना इजा झाल्याने पुण्याचा बालगंधर्व नाट्यमंदिर (18 सप्टेंबर) आणि बोरीवली (19 सप्टेंबर) येथील नाटकाचा प्रयोग रद्द करावे लागले. Vandana Gupte |
‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाबद्दल सांगायचं झाले तर, या नाटकात वंदना गुप्ते यांच्यासह अभिनेत्री तन्वी मुंडले व संकर्षण कऱ्हाडे हे मुख्य भूमिकेत आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. Vandana Gupte |
हेही वाचा:




