अभिनेत्री तेजश्री प्रधान दिसणार ‘लोकशाही’ चित्रपटात; पोस्टर प्रदर्शित

Entertainment: अभिनेत्री तेजश्री प्रधान ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहचली आहे. मालिकेसह तिने चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यानंतर आता तेजश्री ‘लोकशाही’ या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 15 जानेवारीला मकर संक्रांतीनिमित्त ‘लोकशाही’ या नव्या चित्रपटातून तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
या सिनेमातून घराणेशाहीतील सत्तासंघर्ष पाहायला मिळणार आहे. घराणेशाहीतला सत्ता संघर्ष हा मिळालेला लाभ की शास्वत शाप आहे? असा प्रश्न या सिनेमातून उपस्थित केला गेला आहे. तेजश्री प्रधानसोबत ‘लोकशाही’ सिनेमात भार्गवी चिरमुले, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मोहन आगाशे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सुशीलकुमार अग्रवाल यांनी या सिनेमाची निर्मितीची बाजू सांभाळली आहे. तर संजय अमर यांनी लोकशाही सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाचं पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
View this post on Instagram
सुशीलकुमार अग्रवाल निर्मित ‘लोकशाही’ चित्रपट संजय अमर यांनी दिग्दर्शित केला आहे. लोकशाही’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना चित्रपटगृहात महाभारतातील पात्रे आणि त्यांच्या सत्ता संघर्षासारखाच आजच्या कलियुगातील माणसांच्या राजकारण आणि राजघराण्यातील सत्तासंघर्षाचा विलक्षण अनुभव घेता येणार आहे. येत्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.





